खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री संत गजानन महाविद्यालय, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
येथील लाड हॉस्पिटलमध्ये हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन श्री संत सीतारामगडाचे महंत महालिंग महाराज नगरे यांच्या हस्ते झाले. सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी पं.स. सदस्य विजयसिंह गोलेकर, संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, माजी सरपंच शिवकुमार गुळवे, ग्रामपंचायत सदस्य संतोष थोरात, प्रकाश गोलेकर, डॉ. बिपीनचंद्र लाड, प्राचार्य लक्ष्मण घोडके, सुनील साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. मोहसीन शेख, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भारत मेंगडे यांनी केले. प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव यांनी आभार मानले.