शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

गोगलगावात ५३ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST

जिवलग मित्रपरिवार सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, मराठा मावळा संघटना तथा लोकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गोगलगाव ग्रामपंचायत प्रांगणातील ...

जिवलग मित्रपरिवार सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, मराठा मावळा संघटना तथा लोकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गोगलगाव ग्रामपंचायत प्रांगणातील हनुमान मंदिर सभामंडपामध्ये रक्तदान शिबिर पार पडले. जिवलग मित्र परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष देवाभाऊ गाढवे, मराठा मावळा संघटनेचे अमोल पावसे, लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश ठोके, संकेत गुळवे, प्रसाद थोरात, सोपानराव पांढरकर, मंजूश्री गुळवे, अर्चना गुळवे, संगीता चौधरी उपस्थित होते.

रक्तदात्यांना व उपस्थितांना चहा, नाश्त्यासोबत मास्क, सॅनिटायझर, सीताफळ, गुळवेल, अडुळसा, आंबा, चिंच, आवळा आदी वृक्ष भेट देण्यात आले. जिवलग मित्र परिवार सोशल फाउंडेशन, मराठा मावळा संघटना यांच्या वतीने कोरोना योद्‌ध्यांचा गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरात तब्बल २५ शेतकऱ्यांनी, तर ५ महिलांनी रक्तदान केले.

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट, निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथील तरंग उद्योग समूह, लोणी पोलीस ठाणे यांच्यासोबत पाटबंधारे विभागाचे गणेश हारदे, सचिनदादा आहेर, मंडल अधिकारी अनिल मांढरे, भूषण खताळ, अभिषेक थोरात, सुयोग भुजबळ, नरेश बाचकर, माउली बोरचटे, राधाकृष्ण गुळवे, अक्षय बांगर यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ‘लोकमत’चे पत्रकार गणेश आहेर, पत्रकार नितीन गमे, पत्रकार लखन गव्हाणे, नरेश वायकर, दिलीप घुले, ओंकार नलावडे, सुजल गुंजाळ, सविता चौधरी, पूनम गुळवे, मंदाताई चौधरी, शिवाजी चौधरी, गौरी गुळवे, ईश्वरी गुळवे यांनी परिश्रम घेतले.

...........

घराघरात रक्ताची नाती जपण्याचा अन् जोडण्याचा असा एक वेगळा संदेश दिला आहे. या उपक्रमामुळे महिलाही रक्तदान करू शकतात हे ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने पोहोचले. यानिमित्ताने महिलांच्या आरोग्य तपासणीचे एक पाऊल पुढे पडले आहे.

प्रतिभा पाटील, संचालिका, वर्ल्ड परफेक्ट अकादमी, लोणी

.....................

रक्तदाते

मिलिंद आहेर, प्रतिभा पाटील, युवराज गुळवे, अनिल चौधरी, श्रीधर सपकाळ, संकेत गुळवे, अमोल ढगे, विकीन वराडे, धनंजय गिते, विजय गुळवे, सोमेश्वर सातकर, शुभम जत्ती, अनिल शेलार, मच्छिंद्र गायकर, आकाश आचाट, श्रीपाद जाधव, पवन पनले, तुषार पांढरकर, शुभम गायकर, भारत डेंगळे, सचिन चौधरी, सुनील मगर, संकेत मोखाडे, सचिन चोपडे, रवींद्र चौधरी, सविता गुळवे, अभिजित कार्ले, नितीन रिंढे, दादासाहेब खाडे, प्रशांत जायभाय, प्रदीप ढगे, योगेश गुळवे, अक्षय भोर, उषा खताळ, ज्ञानेश्वर भोरकाटे, सुनील निर्मळ, बाबूराव पुंड, भीमराज शेळके, सुमित कोरडे, आकाश सोनावणे, रूपेश सोसे, राधाकिसन गुळवे, निखिल मगर, सचिन धनवटे, महेश गायकर, नीलेश लव्हाटे, मच्छिंद्र गुळवे, श्रीकांत पडवळ, सुनील मगर, सचिन तनपुरे, सतीश कदम, सोमनाथ तारगे, सचिन पोकळे, अभय जाधव, संजय दिवटे.