शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

By admin | Updated: April 10, 2017 03:57 IST

जखमी मादी काळविटाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने उपवनसंरक्षक स

पारनेर (अहमदनगर) : जखमी मादी काळविटाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने उपवनसंरक्षक समितीने पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व गार्ड यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे़पारनेर तालुक्यातील पारनेर-राळेगणसिद्धी मार्गावर राळेगणसिद्धीनजीक २ एप्रिल रोजी मादी काळवीट जखमी अवस्थेत सापडले होते. दोन पायांना जखम झालेल्या या काळविटावर पशुवैद्यकीय अधिकारी गुंड यांच्या देखरेखीखाली वन विभागात उपचार सुरू होते़ उपचारांदरम्यान काळविटाला न्हाणीघरात कोंडण्यात आले होते. त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.मृत्यूनंतरही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांनी तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती पारनेरमधील युवक व पत्रकारांनी जिल्हा वनसंरक्षक लक्ष्मी यांना दूरध्वनीवर दिल्यानंतर त्यांनी तातडीने सहायक वनसंरक्षक संजय कडू यांना घटनास्थळी पाठवले. कडू यांनी या प्रकाराची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व रक्षक शिंदे यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे़ (तालुका प्रतिनिधी)पारनेर येथील वन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या काळविटाच्या मादीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात व नंतरच्या कार्यवाहीत हलगर्जीपणा झाला असून, त्याचा अहवाल जिल्हा वनसंरक्षक लक्ष्मी यांच्याकडे पाठवला आहे़- संजय कडू, उपवनसंरक्षक, वन विभाग, नगर