संगमनेर : थकित वीजबिलांमुळे ग्राहकांची वीजजोडणी खंडित करू नये. वीजजोडणी खंडित करण्याची सुरू असलेली मोहीम त्वरित थांबवानी. १०० युनिटपर्यंत विजेचा वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, यासह अनेक मागण्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने करत शुक्रवारी (दि.५) नवीन नगर रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक शिरीष मुळे, काशीनाथ पावसे, किशोर गुप्ता, राजाराम लांडगे, आप्पासाहेब आहेर, सोपान हासे, दादासाहेब नेहे, दीपक भगत, सुनील खरे, प्रवीण कर्पे, दीपेश ताटकर, संपत गलांडे, भैया परदेशी, भारत गवळी, संजय नाकील, सीताराम मोहरीकर, मनोज जुंदरे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
...
...या आहेत मागण्या
ज्या ग्राहकांना वर्षापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल मार्च २०२०नंतर दिले असेल त्यांना ते हफ्त्याने भरण्याची सवलत द्यावी. सर्व घरगुती ग्राहकांचे मीटर रिडिंग प्रत्यक्ष घेण्यात यावे. अखेरच्या देय तारखेपूर्वी किमान १५ दिवस आधी वीजबिल ग्राहकांना मिळावे. तशा सूचना खासगी कंत्राटदारांना देण्यात याव्यात. भारनियमन बंद व्हावे. कृषिपंपाला दिवसा १२ तास सलग पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा. कृषिपंपांचे वीजबिल शासनाच्या आश्वासनानुसार माफ करावे, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.
----------
फोटो नेम : ०५संगमनेर भाजप आंदोलन
ओळ : संगमनेरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीजबिल माफीसाठी पॉवर हाउससमोर आंदोलन करण्यात आले.