शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पारनेरमध्ये आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:28 IST

पारनेर : नगरपंचायत निवडणुकीबाबत भूमिका ठरविण्यासाठी भाजपची शनिवारी (दि.२७) पारनेर येथे बैठक होणार आहे. नगरपंचायत निवडणुकीबाबत भाजप काय निर्णय ...

पारनेर : नगरपंचायत निवडणुकीबाबत भूमिका ठरविण्यासाठी भाजपची शनिवारी (दि.२७) पारनेर येथे बैठक होणार आहे. नगरपंचायत निवडणुकीबाबत भाजप काय निर्णय घेते, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.

नगरपंचायतीची मतदारयादी सोमवारी (दि. १ मार्च) प्रसिद्ध होणार असून निवडणूकही काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी मागील नगरपंचायत निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार उतरवून शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय औटी यांना आव्हान दिले होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व विजय औटी यांच्या राजकीय भाषणांची जुगलबंदी त्यावेळी चांगलीच रंगली होती. भाजपला त्यावेळी अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, सहयोगी म्हणून पाठिंबा दिलेले उमेदवार त्यावेळी निवडून आले होते.

सध्या वसंत चेडे भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष आहेत. त्यांच्या पारनेर शहरातील नगरपंचायतीची निवडणूक भाजप कशा पद्धतीने लढविणार हा इतर राजकीय पक्षांमध्ये मोठा उत्सुकतेचा विषय आहे. शनिवारी भाजपचे नगरपंचायत प्रभारी माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर येथे बैठक होणार असल्याची माहिती आहे.

....

बैठकीतील उपस्थितांकडे लक्ष...

पारनेर शहरात शनिवारी भाजपची बैठक होणार असून यामध्ये उमेदवारी मागण्यासाठी कोणकोण इच्छुक उपस्थित राहणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बैठकीतील उपस्थितांकडे खास लक्ष असणार आहे.