शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

भाजपात गटबाजीचे ‘कमळ’

By admin | Updated: April 7, 2016 00:05 IST

अहमदनगर : शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर शहर भाजपामध्ये स्थापना दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन झाले.

अहमदनगर : शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर शहर भाजपामध्ये स्थापना दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन झाले. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. त्याकडे गांधी विरोधकांनी पाठ फिरवली. गांधी यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांचे छायाचित्र टाळल्यामुळे पक्षातील गटबाजी कार्यकर्त्यांची तोंडी चांगलीच रंगली़भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन बुधवारी शहरात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी टिळक रोडवरील एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या कार्यक्रमासाठी पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, भाजपा शहराचे प्रथम अध्यक्ष गुलशन जग्गी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाही व्यासपाठीच्या खालीच बसविले होते. पक्ष प्रवक्ते यांची उपस्थिती असल्याने या कार्यक्रमास शहरातील नेत्यांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, या कार्यक्रमाकडे शहरातील मोठे नेते आणि कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. या कार्यक्रमाला गांधी समर्थक, नवे पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी ११ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत भाजपा शहर कार्यालयात गांधी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी गांधी म्हणाले, पक्षाकडे पदाची मागणी केली नव्हती. जी मागणी केली, ती दुसऱ्यांसाठी केली होती. कोअर समितीने शिफारस केल्यांनतर माझी घोषणा करण्यात आली़ (प्रतिनिधी)सत्ता जाताच काँग्रेसकडून शिंगणापूरचा वाद काँग्रेसची सत्ता गेली की शिंगणापुरचा वाद उभा राहतो. १९९९ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर शिंगणापुरला चोरी करायचे आंदोलन झाले आणि आता चौथऱ्यावरून आंदोलन पेटले आहे. शनिशिंगणापुरमध्ये स्त्री-पुरुषांना दर्शन मिळालेच पाहिजे. १९९९ पूर्वीची ४० वर्षे आणि गेल्या पंधरा वर्षात शिंगणापुरबाबत काँग्रेसला वाईट का वाटले नाही? असा सवाल करीत शनी चौथऱ्याच्या दर्शनाबाबत वाद उभा करण्याचा खोडसाळपणा काँग्रेसने केल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. ती बाई काँगे्रसचीचौथऱ्याबाबत अचानक जागी झालेली तृप्ती देसाई २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार होती. देसाई यांच्या नावावर समाजसुधारणेचे कोणते काम आहे. सत्ता गेली की काँग्रेसला वाद उभा करण्याचा खोेडसाळपणा सुचतो. सर्व मंदिरांचे गाभारे, दर्गा, पीर, गुरुद्वारा अशा ठिकाणी महिलांना समान अधिकार द्यावेत. यासाठी काँग्रेस का भांडत नाही, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.गांधी विरोधकांचे सावेडीत रक्तदानखा़ दिलीप गांधी यांच्या विरोधकांनी सावेडीत स्वतंत्र रक्तदान शिबिर आयोजित करून गांधी यांच्या नेतृत्त्वालाच आव्हान दिले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुनील रामदासी, साहेबराव विधाते, महेश नामदे, बाबासाहेब सानप, बाबासाहेब वाकळे, अनंत देसाई, सुमित बटुळे, महेश तवले, हृषिकेश आगरकर, बापुसाहेब बाचकर आदी रक्तदान शिबिरास उपस्थित होते़