राहुरी : कोरोनाकाळ असतानाही कनगर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. गावातील मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी आणला आहे, अशी माहिती सरपंच सर्जेराव घाडगे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या सदस्य नंदा गाढे व त्यांचे पती भास्करराव गाढे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून स्मशानभूमी वॉल कंपाऊंडसाठी ४ लाख, कनगर- गुहा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३० लाख, गणेगाव- वडनेर रस्त्यासाठी १५ लाख, गाढे वस्ती ते घाडगे वस्ती रस्ता खडीकरणासाठी ४ लाख, नालकर वस्ती ते शेटे-घुदे वस्ती रस्त्याच्या खडीकरणासाठी ४ लाखांचा निधी आला आहे. ही सर्व कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
कनगर -गुहा रस्त्यावरील पुलाचे काम व अर्धा किलोमीटर डांबरीकरणासाठी २० लाख, तर दुसऱ्या पुलासाठी ४ लाख, दलित वस्तीमध्ये ५ लाख रुपयांचे रस्ता काँक्रिटीकरण, नवीन स्मशानभूमी बांधकाम ५ लाख, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वॉल कंपाऊंडसाठी ४ लाख, खटेकर वस्ती येथे पाण्याची टाकी ते धामोरे वस्ती पाइपलाइनसाठी ५ लाख, माळवाडी ते संदीप नालकर वस्तीत पाइपलाइनसाठी ६ लाख, वरगुडे वस्ती येथे अंगणवाडीसाठी ८ लाख ५० हजार, उर्दू शाळा खोल्या बांधकामासाठी १७ लाख ५० हजार आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद सदस्य नंदा गाढे यांच्या उपस्थितीत विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच बाबा गाढे, महंमद इनामदार, छायाताई गाढे, सुयोग नालकर, संदीप घाडगे, आण्णासाहेब घाडगे, बाळासाहेब गाढे, अनिल घाडगे, राजू दिवे, रामदास दिवे, भाऊसाहेब आदभाई, धनंजय बर्डे, भगवान घाडगे, रंगनाथ घाडगे, गोरख घाडगे, एम. जी. वाघुंडे, बाबूराव निमसे, ग्रामसेवक पवार, इंजिनिअर शिंदे, प्रकाश घाडगे उपस्थित होते.
110721\img-20210711-wa0136.jpg
कोरोना काळातही कोट्यवधी रुपयांची कामे सुरू -
सर्जेराव घाडगे