शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना!

By | Updated: December 5, 2020 04:34 IST

अहमदनगर : इंदूर (मध्यप्रदेश) येथील उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला ३० महिने उलटले तरी अद्याप वडिलांच्या संपत्तीचा ...

अहमदनगर : इंदूर (मध्यप्रदेश) येथील उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला ३० महिने उलटले तरी अद्याप वडिलांच्या संपत्तीचा ताळमेळ लागलेला नाही. त्यांच्या व ट्रस्टच्या नावावर असलेल्या संपत्तीची संपूर्ण माहिती मला हवी आहे, अशी विनंती भय्यू महाराज यांची कन्या कुहू देशमुख हिने इंदूर येथील जिल्हा न्यायालयात केली आहे, अशी माहिती कुहूच्या वकिलांनी ‘लोकमत’ला दिली.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाची सध्या इंदूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीच्या वेळी कुहू देशमुख ही न्यायालयात हजर झाली होती. यावेळी तिने वडिलांच्या संपत्तीविषयी माहिती हवी असल्याचे न्यायालयाला सांगितले, अशी माहिती कुहूचे वकील ॲड. सुदत जयसिंग पाटील, ॲड. प्रियंका राणे-पाटील, ॲड. भाग्येश पारनेरकर यांनी सांगितले.

मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाडे, शरद देशमुख, पलक पुराणिक यांना केली अटक असून, ते सध्या कारागृहात आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर कुहू ही प्रसारमाध्यमांपासून दूर होती. वडिलांशी निगडित अनेक गोष्टी तिने न्यायालयाला सांगितल्या. यामध्ये संपत्तीचा वाद, भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, परिवारातील अन्य सदस्यांचे वागणे या गोष्टींचा समावेश होता.

कुहूला वडिलांच्या संपत्तीबाबत काहीही माहिती नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांची संपत्ती कुठे-कुठे आहे? त्या संपत्तीची सध्या देखभाल कोण करीत आहे? बँक खाते आणि खात्यामधील व्यवहार कसे सुरू आहेत, याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांच्या संपत्तीवर तिचा पूर्ण हक्क असल्याचा दावाही तिने न्यायालयात केला असल्याचे वकिलांनी सांगितले. वडिलांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशीही मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ८ ते १० डिसेंबरला होणार आहे, असे ॲड. भाग्येश पारनेरकर यांनी सांगितले.