शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

भंडारदरा धरण २५ टक्के भरले

By admin | Updated: July 23, 2014 00:15 IST

अकोले/राजूर : पुष्य नक्षत्रातील पहिल्या चरणात मंगळवारी दिवसभर शहर परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड या आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडला.

अकोले/राजूर : पुष्य नक्षत्रातील पहिल्या चरणात मंगळवारी दिवसभर शहर परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड या आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडला. सोमवारी घाटघरला ४, तर रतनवाडीला ६ इंच पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रवरा खोऱ्यातील कृष्णवंती नदीवरील वाकी व मुळा खोऱ्यातील आंबीत, कोथळे व शिळवंडी लघुपाटबंधारे तलाव ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत भंडारदऱ्यात १९० दलघफू नवीन पाणी येऊन साठा २ हजार ८०० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला. रविवारी पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर ओसरला होता, मात्र सोमवार, मंगळवार पुष्य नक्षत्रातील मुसळधार सरींनी बरसात केली. अकोले शहरातून यावर्षी प्रथमच पाणी वाहिले. भंडारदरा धरणात सोमवारी झालेल्या पावसाने २४ तासांत २१७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली. सोमवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये घाटघर - ९२ (१०९०), रतनवाडी- १४२ (११५२), पांजरे- ६२ (५६४), वाकी- ५० (४०७), भंडारदरा- ५४ (४६१), कोतूळ १३ (८४), निळवंडे- १४(६३), आढळा- २ (१४), अकोले- २०(३०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे निळवंडेत ५१४ दशलक्ष घनफूट साठा झाला. आंबीत, कोथळा, शिरपुंजे, वाकी तलाव ओसंडून वाहत असून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीपात्रातून ७ हजार ३५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)मुळा धरणात पावणेदोन टीएमसी नवे पाणीराहुरी : हरिश्चंद्रगड व कोतूळ या मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणात १८०० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची नोंद झाली. मंगळवारी धरणात तब्बल ७३५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे हा साठा ६७०० दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. सोमवारी मुळा नदीतून धरणात ४३२७ क्युसेकने आवक सुरू होती. परंतु पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने आवक ३ हजाराने वाढून ७३५० क्युसेक झाली.