अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार १ फेब्रुवारी ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यामध्ये बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र, आस्थापना कार्ड या सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिक ज्या भागात राहत आहेत, त्या भागातील निवासाचा पुरावा देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. असा पुरावा न दिल्यास संबंधित शिधापत्रिका रद्द होणार आहे. सदरचा पुरावा एक वर्षापेक्षा जास्त जुना असणार नाही, हेही पाहिले जाणार आहे. नागरिकांनी पुरावा आणि अर्ज संबंधित स्वस्त धान्य दुकाने, तहसील कार्यालयात द्यावयाचा आहे, असे माळी यांनी सांगितले.
---
कोणाचा लाभ बंद होणार
दुचाकी असल्यास
पक्के घर असल्यास
बागायती, जिरायती जमीन असल्यास
४४ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न (ग्रामीण)
५९ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न (शहरी)
----------
शिधापत्रिकेवर सध्या काय मिळते ?
शुभ्र व केशरी- काहीही नाही
पिवळी (अंत्योदय)-२५ किलो गहू, १० किलो तांदूळ, एक कि. डाळ
प्राधान्य कुटुंब- ३ किलो गहू, २ किलो तांदूळ, एक कि. डाळ
------------
जिल्ह्यातील शिधापत्रिकांची संख्या
अंत्योदय- ८८६१८
प्राधान्य कुटुंब- ६०५५२४
केशरी-३३५६६०
शुभ्र-५८५८३
एकूण-१०८८३८५
-------------
ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, दुचाकी आहे, पक्के घर आहे, अशा नागरिकांनी स्वत:हून शिधापत्रिकेवर मिळणारा लाभ सोडावा तसेच एक फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अपात्र शिधापत्रिका मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. तलाठी, तहसील कार्यालय, स्वस्त धान्य दुकानांमध्ये अर्ज भरून द्यावा. त्यासोबत रहिवासाचा पुरावा द्यावा. अन्यथा शिधापत्रिका बाद होतील. या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
--
फोटो- २ रेशनकार्ड