शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार हेक्‍टर क्षेत्राला एस्केप योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST

पारनेर : पारनेर व शिरूर तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील अडीच हजार हेक्‍टर क्षेत्राला ‘एस्केप’ योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगतानाच पारनेर ...

पारनेर : पारनेर व शिरूर तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील अडीच हजार हेक्‍टर क्षेत्राला ‘एस्केप’ योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगतानाच पारनेर तालुक्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी (भोकरी) येथील सुमारे सहा कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन व कुकडी डावा कालवा चारी क्र.१३ मधील विमोचक बांधकामाचे उद्घाटन वळसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार निलेश लंके अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते.

वळसे म्हणाले, जांबुत ते गाडीलगावपर्यंतचे कुकडी नदीवरील सर्व बंधारे विनाविलंब व पूर्ण क्षमतेने भरून देणार असून पारनेर व शिरूर तालुक्यांतील नदीकाठच्या अडीच हजार हेक्टर जमिनीसाठी एस्केप योजनेचा लाभ होणार आहे.

लंके म्हणाले, कामगारमंत्री वळसे पाटील यांचे पारनेर तालुक्यावर विशेष प्रेम असल्याने त्यांच्यामुळे पाटपाण्यासाठी तालुक्याला झुकते माप मिळते. कुकडीच्या पाण्याचे नियोजन करताना आवर्तन पंधरा दिवस अलीकडे लवकर आल्यास तुटवडा जाणवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी म्हस्केवाडीचे सरपंच डॉ. किरण पानमंद, सावळा पानमंद, आनंद चौधरी, अरुण पवार, अनिल गंधाक्ते, गोविंद साबळे, संतोष काटे, बाळासाहेब पुंडे, सचिन साखला, विकी लंके, आकाश चौधरी, बाळासाहेब लंके, बंटी दाते, नूर कुरेशी, गणेश जाधव, प्रभाकर म्हस्के, जयदीप म्हस्के, समाधान म्हस्के, रोहन म्हस्के आदी उपस्थित होते.

फोटो : ३१ वळसे

म्हस्केवाडी (भोकरी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करताना मंत्री दिलीप वळसे, आमदार निलेश लंके व इतर.