श्रीरामपूर : तालुक्यातील टिळकनगर येथे झालेल्या हाणामारीत मृत्यूमुखी पडलेल्या आदेश लोखंडे यांचा मृत्यू बंदुकीची गोळी लागून झाला की अन्य शस्त्राने याचे कारण अद्याप निश्चित नसल्याचे तपासी अधिकारी राठोड यांनी सांगितले.आदेश याच्या मृतदेहाचे औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल व नमुने (शवविच्छेदनातील) तपासणीसाठी मुंबईस पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आदेशचा मृत्यू कशामुळे झाला हे निश्चित होईल.घटनास्थळी बंदुकीची गोळी सापडली असल्याचे यापूर्वी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले होते. त्यावरून आदेशचा मृत्यू गावठी कट्ट्यातील गोळी लागून झाला, असा गुन्हा नोंदविला गेला आहे. या घटनेत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे उत्तर जिल्हाध्यक्ष भीमा बागूल, शरद कोरडे, बाबा आघाडे यांना अटक करण्यात आली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. (वार्ताहर)या घटनेतील मुख्य आरोपी सागर भोसले व अन्य १० ओळखीचे आरोपी आणि अनोळखी २५-३० आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत़अटक केलेल्या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले.
लोखंडेच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST