शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: March 27, 2016 23:41 IST

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़ हा पाणीसाठा पुढील चार महिने पुरेल़ मात्र, जुलैपर्यंत वरुणराजाची कृपा न झाल्यास काय, याची चिंता सध्या सर्वांना लागून आहे़उन्हाचा पारा एकदम वाढला आहे़ सर्वांच्या घशाला कोरड पडली आहे़ पिण्याच्या पाण्याची मागणी मार्च अखेरीस अचानक वाढली़ बहुतांश गावांतील पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील धरणांवर आहे़ मात्र, जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले गेले़ त्यामुळे या दोन्ही धरणांतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली़मुळात सध्या ७ हजार ७८५ तर भंडारदरा धरणात अवघा १ हजार ८५९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे़ उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे़ उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले़ दोन्ही धरणांतून पिण्यासाठी प्रत्येकी चार आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे़ गावतळे भरून तेथून टँकरने पाणी पुरविले जाणार आहे़ परंतु वाहतुकीचे अंतर वाढणार असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होण्याची शक्यता आहे़ गावांसह वाड्यावस्त्यांवरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे पुढील दोन महिन्यांत टँकरची संख्या वाढणार आहे़ दक्षिण नगर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे़ कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे़ त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटेल़ उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपुरासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा धारणातून आवर्तन सोडण्यावर एकमत झाले आहे़ (प्रतिनिधी)