शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बारगाव नांदूर येथील अवैध उपशावर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील मुळा नदीपात्रात मातीमिश्रित वाळूचा लिलाव अधिकृत आहे. वाळूचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला शेतजमिनीतून मातीमिश्रित वाळू ...

राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील मुळा नदीपात्रात मातीमिश्रित वाळूचा लिलाव अधिकृत आहे. वाळूचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला शेतजमिनीतून मातीमिश्रित वाळू उपसा करण्याची परवानगी दिली आहे. ३०० ब्रास वाळू उपशाची परवानगी असताना दररोज ५० ते ६० डंपरमधून हजारो ब्रास वाळूची वाहतूक सुरू आहे. या अवैध उपशामुळे बारागाव नांदूर ते राहुरी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. बारगाव नांदूर येथे १ मार्च रोजी काही महिला घरासमोर बसल्या होत्या. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरून वळण घेताना डंपर थेट महिलांच्या अंगावर गेला. मात्र, महिला सावध असल्याने अनर्थ टळला. मात्र, ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले, राहुरी येथे प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी दयानंद जगताप हे काम पाहत आहेत. बारगाव नांदूर येथील अवैध वाळू उपसा आणि महिलांच्या अंगावर डंपर घालण्याच्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.

------------

लिलावाची चौथी फेरी

जिल्ह्यात १८ पैकी तीन रेतीघाट सरकारी कामांसाठी राखीव असून, संगमनेर तालुक्यातील एका रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. उर्वरित १४ रेतीघाटांसाठी तीनवेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ई-लिलाव व ई-बोलीसाठी चौथ्यांदा फेरी जाहीर करण्यात आली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असून, बोटीने उपसा करण्यास परवानगी नाही. त्यामुळे लिलावास प्रतिसाद नसल्याचे प्रशासनाने सांगितले.