अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पद्मानगरमधील एका घरात पान मसाला व तंबाखू पाऊच साठविले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी रा. ना. बढे, यू. आर. सूर्यवंशी व नमुना सहायक प्रसाद कसबेकर हे संगमनेरात आले. पान मसाला व गुटखा साठविलेल्या ठिकाणी त्यांनी जात घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कुणीही बाहेर येत नसल्याने त्यांनी याबाबत संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना कळविले. त्यानंतर मदने यांनी तेथे पोलीस कर्मचारी पाठविले असता काही वेळाने दरवाजा उघडण्यात आला. या घरात गाेण्यांमध्ये भरलेले बंदी असलेला पान मसाला व तंबाखू पाऊच आढळून आले. हा मुद्देमाल शहर पोलीस ठाण्यात आणत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
--------------