श्रीरामपूर : तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील वारकरी संप्रदायातील ह. भ. प. चांगदेव महाराज बडाख यांची राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या मालुंजा बुद्रुक शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष ह. भ. प. रामेश्वर महाराज झुराळे, कोषाध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब महाराज धानापुले यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले आहे.
मालुंजा बुद्रुक येथील स्व. ह. भ. प. भागवत महाराज बडाख यांनी ३५ वर्षे वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासला. सुमारे ३५ वर्षे अखंडित पंढरपूरच्या पायी वाऱ्या केल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर ग्रामस्थांनी गावात भागवत बडाख महाराज यांचे मंदिर उभारले आहे. बडाख महाराज यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर गेल्या २० वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा वारसा सुरू ठेवला आहे. गावातील भजन, कीर्तन, इतर धार्मिक कार्यक्रम यासह हरिनाम सप्ताहामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
.........