कोपरगाव : शहरातील श्री लाईफ केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यापूर्वी एका महिलेने ६२० ग्रॅम वजनाच्या शिशूला जन्म दिला होता. या शिशूवर डॉ. संतोष तिरमखे यांनी बाल अतिदक्षता विभागात तब्बल ६८ दिवस उपचार केल्यानंतर १५०० ग्रॅम वजन झाले आहे. या बाळाला नुकतेच घरी सोडले असून या नवजात शिशूसाठी श्री लाईफ केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल देवदूत ठरले आहे.
श्री लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी प्रकृती खालावलेल्या एका महिलेची डॉ. योगेश लांडे यांनी सिझेरियन प्रसूती करून आई तसेच बाळाला सुखरूप ठेवले. परंतु, जन्माला आलेल्या नवजात शिशूचे वजन अवघे ६२० ग्रम भरले. अशा कमी वजनाच्या बाळाला वाचविण्यासाठीचे उपचार हे मोठ्या शहरांमध्येच होतात. त्यासाठी मोठा खर्च येतो. मात्र, हॉस्पिटलचे नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. संतोष तिरमखे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल अतिदक्षता कक्षाचे देवीदास सोळसे, स्नेहल जगताप, स्नेहा पंडोरे, कविता शिंदे यांनी उपचार सुरु केले. तब्बल ६८ दिवस जगण्याचा संघर्ष करून डॉ. तिरमखे यांच्या उपचारांमुळे या बाळाने जगण्याची लढाई जिंकली. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. भगवान शिंदे, भूलतज्ज्ञ डॉ. बी. एस. ढाकणे यांचेही सहकार्य लाभले. (वा.प्र.)
..............
फोटो १८ कोप हॉस्पिटल
नवजात शिशूवर तब्बल ६८ दिवस उपचार केल्यानंतर सुट्टी देताना सर्व टीम भावुक झाली होती.