दहिगावने : शेवगाव शहर व तालुक्यात राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद व त्यांचे सहकारी भारूड, पथनाट्याद्वारे ‘कोरोनाला हरवूया देश आत्मनिर्भर बनवूया’ हे ब्रीद घेऊन जनजागृती करत आहेत.
प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, महाराष्ट्र व गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार पंजीकृत जय हिंद लोककला मंच (भातकुडगाव, ता. शेवगाव) संपूर्ण तालुक्यात भारूड व पथनाट्य सादर करत आहेत. या पथनाट्याचे भावीनिमगाव, दहिगावने, शहरटाकळी येथे शनिवारी सादरीकरण करण्यात आले. यावेळी कोविड-१९ प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून त्यापासून कोणताही धोका नाही. त्यामुळे समाजात पसरत असलेल्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर आजच्या तरुणांनी आत्मनिर्भर भारत स्वदेशीचा वापर करून उद्योगी बनून स्वतः आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा संदेश दिला गेला.
पथकाचे प्रमुख राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद, त्यांचे सहकारी भाऊसाहेब मनाळ, प्रमोद दळवी, संकेत वामन, विशाल साळवे, ज्ञानेश्वर गुजर, मुबारक सय्यद, विठ्ठल कोबरणे, रथचालक-चक्रधर जाधव या चित्ररथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात यापुढे जनजागृती करणार आहेत. भावीनिमगाव येथील कार्यक्रमावेळी माजी उपसरपंच रवी व्यवहारे, बबन क्षीरसागर, चंपालाल मुंगसे, संजय भगत, मच्छिंद्र काटे आदींसह नागरिक उपस्थित होते.
---
२८ दहिगावने
भावीनिमगाव येथे चित्ररथात पथनाट्य व भारूड सादरीकरणातून भारूडकार हमीद सय्यद व सहकाऱ्यांनी कोरोनविषयी जनजागृती केली.