शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून अमरधाम बनतेय ‘स्वर्गद्वार’

By admin | Updated: March 20, 2016 00:48 IST

अण्णा नवथर, अहमदनगर लोकसहभागातून प्रश्न सहज कसे सुटू शकतात, ते दाखवून दिले आहे ते येथील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी़

अण्णा नवथर, अहमदनगरअमरधामधील दुरवस्थेबाबत तक्रारी अनेकजण करतात़ मात्र, कुठेही तक्रार न करता लोकसहभागातून प्रश्न सहज कसे सुटू शकतात, ते दाखवून दिले आहे ते येथील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी़ सुविधांसाठी पैसे नको, सुविधा द्या, अशी हाक त्यांनी दिली़ अवघ्या दोन महिन्यांत पन्नास फूट लांबीचे शेड, दशक्रियाविधीसाठी दोन चौथरे, एक बोरअवेल, पाण्याचा हौद, पेव्हेर आणि रोप यांसारख्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ लोकसहभागातून अमरधाम खरेखुरे एक स्वर्गद्वार बनेल यात शंका नाही, अशीअपेक्षा या पदाधिकाऱ्यांना आहे़अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी शहरासह इतर ठिकाणचेही लोक जमतात़ पण, तुटपुंज्या सुविधांमुळे नातेवाईकांची तारांबळ होते़ ती होऊ नये, असे प्रत्येकाला वाटते़ ही गरज लक्षात घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे यांच्यासह सुधाकर बोरुडे, मोहन बेरड, प्रशांत अनमल, दीपक पवार यांनी २९ जानेवारी रोजी कामाला सुरुवात केली़ स्वच्छता केली़ स्वच्छतेनंतर इथे काय करता येईल, यावर त्यांनी चर्चा केली़ दशक्रिया विधीला जागा कमी पडते, असे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यासाठी दोन चौथरे बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला़ निर्णय झाला आणि ते बांधून देण्यास दिल्ली गेटपरिसरातील औषधालय चालक तयार झाले़ त्यांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली़ नातेवाईकांना बसण्यासाठी शेड हवे आहे़ एकाने शेड बांधण्यासाठी पैसे देऊ केले, पण ते त्यांनी घेतले नाही़ मग शेडच त्या व्यक्तीने बांधून द्यावे, असे ठरले़ पाणी आणणार कुठून, असाही प्रश्न समोर आला़ त्यासाठी बोअर घेऊन देण्याची जबाबदारी सुरेश मॅना यांनी उचलली़ भिंतींना रंग अनमल यांनी स्वखर्चातून दिला़ भिंतीही चकाचक झाल्या़ शौचालये एकाने बांधून देणार असल्याचे सांगितले आहे.