शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकऱ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

श्रीरामपूर : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप श्रमिक ...

श्रीरामपूर : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप श्रमिक शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. त्यात हा आरोप करण्यात आला.

आजपर्यंत दिल्लीच्या आंदोलनात दोशनेपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. १४५ शेतकरी बेपत्ता आहेत. त्याबाबत सरकार दरबारी कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांप्रती बेदरकारपणे उत्तरे दिली जात आहेत. सरकारी यंत्रणा वापरून हे आंदोलन बदनाम करण्याचा, चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, अशी टीका संघटनेने केली आहे.

शेतकरी आंदोलक कायदा वापसी नही तो घरवापसी नाही या मागणीवर ठाम आहेत. दिवसेंदिवस आंदोलनाचा जोर वाढत आहे. पंतप्रधान स्वत: चर्चेला तयार आहोत असे सांगत असले तरी त्याबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. हा दडपशाहीचा प्रकार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे तत्काळ मागे घ्यावेत. केरळ व पंजाब राज्यांच्या सरकारांनी केलेल्या ठरवाप्रमाणे महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारनेही निर्णय घ्यावा. शेतीमालाला आधारभूत किमत देणाऱ्या एमएसपीचा कायदा करावा व तेवढी किंमत न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर शिक्षा व दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील मका, सोयाबीन, कापूस ,कडधान्य या प्रमुख पिकांची हमीभावात खरेदी करणारी केंद्र राज्य सरकारने सुरू करावीत. सध्याच्या बाजार समिती कायद्यामध्ये शेतकऱ्यांना अनुकूल असे बदल करण्यात यावे, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉ.राजेंद्र बावके, जीवन सुरूडे, श्रीकृष्ण बडाख, उत्तम माळी, लखन डांगे, अजय बत्तीसे, राहुल दाभाडे,अस्लम शेख, राहुल मेहत्रे आदींच्या सह्या आहेत.

--------