लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील १४ हजार बांधकाम मजुरांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत मिळाली आहे. याशिवाय अवजारे खरेदीसाठी ८ हजार ६९४ मजुरांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडून ही मदत तत्काळ दिल्याने कोरोनाच्या लॉकडाऊन काळात बांधकामासारख्या धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बांधकाम मजूर व इतर मजूर हे असंघटित क्षेत्रात येतात. या असंघटित कामगारांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, तसेच मजुरांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत योग्य ती दक्षता इमारत मजूर कल्याणकारी मंडळाकडून घेतली जाते. बांधकाम मजूर हे धोकादायक क्षेत्रात काम करीत असल्याने, त्यांच्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. बांधकाम मजुरांची आता ऑनलाइन नोंदणी केली जात असून, आर्थिक मदतही थेट खात्यावर जमा केली जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५६ हजार ५२८ मजुरांची नोंदणी झालेली आहे. अद्यापही २३ हजार ९८० मजुरांशी प्रत्यक्ष संपर्क साधलेला नाही. त्यामुळे त्यांना मदत पोहोचविणे कठीण असल्याचे कल्याणकारी मंडळाने स्पष्ट केेले.
-----------
एकूण नोंदणी झालेले बांधकाम मजूर - ५६,५२८
मदत मिळालेल्या मजुरांची संख्या - १४,०८९
नूतनीकरण न केलेले मजूर - १,२४७
सुरक्षा साहित्य मिळालेले मजूर - १९,२९४
-------------
मदतीशिवाय मिळाले सुरक्षा साहित्य
अवजारे खरेदीसाठी पाच हजार, कोरोना लॉकडाऊन काळात दोन टप्प्यांत पाच हजार रुपयांशिवाय तब्बल १९ हजार २९४ मजुरांना अत्यावश्यक साहित्य देण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा किटमध्ये चटई, जेवणाचा डब्बा, पाणी बॉटल, टॉर्च, बॉग असे साहित्य देण्यात आले होते, तर शूज, हॅण्डग्लोज, सेप्टी जॉकेट, हेल्मेट, रिफेक्ट जॅकेट असे सुरक्षा साहित्य देण्यात आले होते.
--------------
इमारत बांधकाम मजुरांची आता ऑनलाइन नोंदणी होत आहे. पूर्वीच्या मजुरांनी त्यांचे नुतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोरोना लॉकडाऊन काळात मजुरांपर्यंत शंभर टक्के मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि ओळख देणारे आवश्यक कागदपत्रे दिल्यास सदर मजूर राज्याबाहेरचा असला, तरी त्याची संकेतस्थळावरून नोंदणी करता येते.
- चंद्रकांत राऊत, सहायक कामगार आयुक्त, अहमदनगर
----------------
डमी- नेटफोटोत
०५ गव्हर्नमेंट हेल्प फॉर सिव्हिल लेबर लॉकडाऊन डमी (जेपीजी व पीडीएफ)
फोटो- सिविल लेबर