शेवगाव : कोरोना कुटुंब पाहणी सर्वेक्षणाचे काम आशा स्वयंसेविकांच्या जॉब चार्टमध्ये नसल्याने ते अन्य यंत्रणेकडून करून घ्यावे. हे काम दिलेच तर आवश्यक संरक्षक साहित्य व दैनंदिन पाचशे रुपये भत्ता मिळावा, अशी मागणी शेवगाव नगरपरिषदेतील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
भाकपचे राज्य सहसचिव, आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष लांडे, तालुकाध्यक्ष संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखालील आशा स्वयंसेविकांनी हे निवेदन बुधवारी (दि. ९) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना डी. सी. साळवे यांच्या मार्फत दिले. शेवगाव शहरातील कोरोना कुटुंब पाहणी सर्वेक्षण कामाचे आदेश आशा स्वंयसेविकांना देण्यात आले आहेत. पंरतु, आरोग्य संचालनालयाच्या आशा कर्मचाऱ्यांसाठी नेमून दिलेल्या कामांव्यतिरिक्त कामे देऊ नयेत, असे आदेश दिलेले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अंजली भुजबळ, सुलभा महाजन, सुनेत्रा महाजन, ज्योती ढोले, संगीता पिसोटे, सुनीता सोनटक्के, संगीता रायकर, रत्नमाला क्षीरसागर, रंजना परदेशी, वैशाली झिरपे, सुरेखा राऊत, वैशाली वाघुले, आरती मोहिते, अलका पाचे, स्वाती क्षीरसागर, अनिता भुजबळ, सुवर्णा साळुंके, वैशाली देशमुख, सुजाता कळंबे, अनिता भुजबळ, पौर्णिमा इंगळे आदी उपस्थित होते.
090621\img-20210609-wa0031.jpg
वेडी शिवारात अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या युवकाला आटक