शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

अहमदनगरमधील कापूरवाडीच्या जलाशयात विदेशी पाहुण्यांचे आगमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 17:47 IST

थंडीची चाहूल लागताच नगर जवळील कापूरवाडी येथील निळ्याशार जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात होते. पक्षी दिनाच्या निमित्ताने आज झालेल्या पक्षी निरीक्षणात ३० प्रकारच्या रंगी-बेरंगी पक्षांची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयुरोपियन पक्षांचे आकर्षण

योगेश गुंड अहमदनगर : थंडीची चाहूल लागताच नगर जवळील कापूरवाडी येथील निळ्याशार जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात होते. पक्षी दिनाच्या निमित्ताने आज झालेल्या पक्षी निरीक्षणात ३० प्रकारच्या रंगी-बेरंगी पक्षांची नोंद करण्यात आली आहे. थंडीची तीव्रता वाढल्यानंतर आणखी विदेशी पाहुणे या जलाशयावर विहार करण्यास जमणार आहेत.

विदेशी रंगी-बेरंगी आकर्षक पक्षांचे विहरण्यासाठी असलेले आवडते ठिकाण म्हणजे कापूरवाडीचा विस्तीर्ण पसरलेला निळाशार जलाशय. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे तलावातील पाणीसाठा घटला. यामुळे विदेशातून येणा-या पाहुण्यांची संख्या घटली होती. यावेळी पाउस चांगला झाल्याने कापूरवाडी येथील तलावात पाणीसाठा वाढला आहे. थेट विदेशातून येणा-या रंगी-बेरंगी पाहुण्यांनी तलाव बहरू लागला आहे.  पक्षी दिनाचे निमित्त साधून पक्षी अभ्यासक व निसर्ग मित्र मंडळ यांच्या वतीने पक्षी निरीक्षणाची मेजवानी आयोजित केली होती. यास नगर मधील हौशी पक्षीप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. तलावाच्या भिंतीजवळ असणा-या झाडांवर युरोपातून आलेल्या पळसमैना पक्षांच्या थव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी गुलबस पायांच्या आणि शिडशिडती बांध्याच्या शेकात्या पक्ष्यानी तलावाच्या काठावर हजेरी लावली. यावेळी पक्षी अभ्यासक डॉ.सुधाकर कु-हाडे व कार्तिक स्वामी इंगळे यांनी पक्षी दिनाची माहिती दिली. टेलिस्कोप लाऊन सर्वांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. पक्षीमित्र बापूसाहेब भोसले, शाम भंडारी, विलास पाटील, राजेंद्र स्वामी, विजय देवचके, संध्या कु-हाडे, अरविंद गोरेगावकर यावेळी उपस्थित होते.

या पाहुण्यांचे झाले आगमनलडाख वरून येणारे चक्रवाक, युरोपातील तलवार बदक, चित्र बलाक, चमचे, राखी बगळे, लालसरी बदक, चांदवा, पानडुबी,धोबी, खंड्या, हुप्पो ,खाटिक, कोतवाल, मुनिया, वेडे राघू, साथभाई, चीरक, मैना आदी पक्षांचे आगमन झाले आहे.

संख्या आणखी वाढणार जलाशयात समाधानकारक पाणी असल्याने विदेशी पाहुणे असणारे रंगी बेरंगी पक्षी विहरण्यासाठी येत आहेत. पाणीसाठा काहीसा कमी झाला कि आणखी विदेशी पक्षी पाहुणचारास येतील असा अंदाज आहे.