मंडलाधिकारी बाळासाहेब कचरू जाधव व मनोज ज्ञानेश्वर मंडलिक असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार याने त्याच्या चुलत्यास शेतजमीन विकली होती. मात्र विक्रीदस्तामध्ये चुकीचे क्षेत्र नमूद झाले होते. याच दस्ताच्या अधारे शेतीचा फेर नोंद झाली होता. तक्रारदार याने हा फेर रद्द करण्यासाठी अर्ज दिला होता. मंडलाधिकारी जाधव याने रद्द लेखाप्रमाणे खरेदीची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे मध्यस्तीच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंति आठ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. दरम्यान, याबाबत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली होती. सोमवारी जाधव याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्वीकारले. यावेळी पथकाने जाधव याच्यासह पैशाची मध्यस्ती करणाऱ्या मंडलिक या दोघांना अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करंडे, पोलीस नाईक चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, संध्या म्हस्के, हरून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.