शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राचा धाक दाखवून दागिने लांबविले

By admin | Updated: October 29, 2016 00:39 IST

कुकाणा : शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने, पाच हजार रोख असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा ऐवज नेला.

कुकाणा : शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने, पाच हजार रोख असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा ऐवज नेला. नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील काळे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याबाबत निलेश दत्तात्रय काळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, मी व पत्नी विमल घराच्या वरील मजल्यावर झोपलो होतो. पाच ते सहा चोरट्यांनी घरासमोरील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. वरील मजल्यावर येऊन आमच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले. येथे त्यांच्या हाती काही न लागल्याने चोरटे आई कमल दत्तात्रय काळे, मुलगी प्रियंका,भावजय कुंदा रविंद्र काळे, पुतण्या विक्रम काळे, मुलगा वैभव हे ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीत चोरट्यांनी जाऊन त्यांना काठी, तलवार, कुऱ्हाड या शस्त्राचा धाक दाखविला व कपाटातील सामानाची उचकापाचक करून सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार घेऊन पोबारा केला. कुकाणा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गर्जे यांनी पोलिसांसह परिसर पिंजून काढला. चोरट्यांनी फुल पॅण्ट, जर्किन व तोंडाला रूमाल बांधलेला होता तसेच ते हिंदी, मराठीतून बोलत होते, असे निलेश काळे यांनी सांगितले. पोलिसांनी उपलब्ध काही छायाचित्रे काळे कुटुंबीयांना दाखविली असता काही फोटो त्यांनी ओळखले. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली आहेत. चोरीच्या तपासासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी दुचाकीचा वापर केला असल्याचेही काळे यांनी सांगितले. पुढील तपास नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, सहाय्यक निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे करीत आहेत. चोरट्यांनी अंतरवाली येथील बाबासाहेब देशमुख यांच्या घरातूनही पाच हजार रुपये रोख व १५ हजार रुपये किमतीच्या कानातील रिंगा चोरून नेल्याचे समजले. (वार्ताहर)