शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लोहारे-मिरपूर येथे ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील आहेत. ऑक्सिजन ...

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील आहेत. ऑक्सिजन रिफिलिंग केंद्राचे संचालक भाऊराव जोंधळे, डॉ. संदीप पोकळे, भाऊराव कदम, कृष्णा पोकळे आदी यावेळी उपस्थित होते. महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेर येथे कोरोना आढावा बैठकीत ऑक्सिजन पुरवठादार राम सुरेश जाजू यांना बोलवून याकामी सूचना दिल्या होत्या. अहमदनगर शहरातही तातडीने ऑक्सिजनपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. याचबरोबर तळेगाव भागातील लोहारे-मिरपूर येथे कार्यरत असलेले ऑक्सिजन रिफिलिंग सेंटर काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. कारखान्याचे संचालक थोरात यांनी तांत्रिक अडचणी समजून घेत मंत्रालयीनस्तरावर त्याचा पाठपुरावा करत पेसोकडून तातडीची मंजुरी मिळून दिली. त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन देण्याऐवजी हा ऑक्सिजनपुरवठा शासकीय व खाजगी रुग्णालयांत रुग्णांना पुरविला जाणार आहे.

...................

कोरोना हे मानवावरील संकट आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोरोना उपाययोजनांचा दररोज आढावा घेत असून ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत करण्याकरिता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लोहारे-मिरपूर येथील रिफिलिंग सेंटरमुळे आपल्या परिसरातील शासकीय व खाजगी रुग्णालयांना ऑक्‍सिजन मिळणार असून याचा लाभ थेट रुग्णांना मिळणार आहे.

इंद्रजित थोरात, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना