न्यू आर्टस महाविद्यालयातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत बारवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे पहिले प्रशिक्षण देण्यात आले. पाटील यांनी सर्व मतदान अधिकाऱ्यांना स्वत प्रशिक्षण देत मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. यावेळी मतदान अधिकाऱ्यांच्या शंकाचेही निरासन करण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतदान अधिकाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुरळीत राहावी यासाठी खबरदारी घेण्याची सूचना केली.
दरम्यान नगर तालुक्यात अंदाजे २३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसारच मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३०० मतदान केंद्राध्यक्ष व त्यांना सहाय्यक म्हणून १ हजार २०० मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात मतदान अधिकारी दोन व तीन यांना प्रशिक्षण देण्यात आले. मतदानाची प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक्स यंत्रावर होणार असल्याने या यंत्राचे प्रशिक्षण मंगळवारपासून पाऊलबुद्धे विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्रज्ञ हे प्रशिक्षण देणार आहेत.
सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींचा विचार क़रून मतदान केंद्राची संख्या निश्चित होणार आहे.
....
नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात दीड हजार मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. मतदान प्रक्रियेतील बारकावे व निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचना त्यांना सांगण्यात आल्या. दुसरे प्रशिक्षण पुढील आठवड्यात होणार आहे.
-उमेश पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, नगर तालुका.
...
०२ निवडणूक ट्रेनिंग
..
ओळी-नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दीड हजार मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात सहभागी झालेले अधिकारी.