शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सत्ताधारी-विरोधक आमने सामने

By admin | Updated: August 12, 2014 23:20 IST

नेवासा : नेवासा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या होऊ घातलेल्या उद्घाटन समारंभाचे भांडवल करीत विरोधक व सत्ताधारी आमने-सामने उभे ठाकल्याने पंचायत समितीचा परिसर मंगळवारी दुपारी गजबजून गेला होता.

नेवासा : नेवासा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या होऊ घातलेल्या उद्घाटन समारंभाचे भांडवल करीत विरोधक व सत्ताधारी आमने-सामने उभे ठाकल्याने पंचायत समितीचा परिसर मंगळवारी दुपारी गजबजून गेला होता. विरोधकांनी बुधवारी उद्घाटन होऊ नये म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना घेरावो घातला. तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना जाब विचारला यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. काहींनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.नेवासा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत २ कोटी ४८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. या इमारतीचा उद्घाटन समारंभ १३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते करण्याचे ठरले. त्याच्या पत्रिकाही वाटण्यात आल्या. मंगळवारी या इमारतीच्या गृहप्रवेशासाठी मुख्य प्रवेशद्वारावर कलशपूजनासह इतर विधी पं.स. सदस्या विमलताई बहिरट व बापूराव बहिरट, सविता शिंदे व संजय शिंदे यांच्या हस्ते विधीवत पूजेने करण्यात आला. पूजा सुरू असतानाच मुख्य विरोधक बाळासाहेब मुरकुटे, पं.स. सदस्य जानकीराम डौले, जनार्दन जाधव, शिवसेनेचे गोरक्षनाथ घुले, भाजपचे युवा नेते अनिल ताके, मनसेचे नेते दिलीपराव मोटे, साहेबराव घाडगे, अंबादास लष्करे, किरण शिंदे, संजय माळवदे या प्रमुख कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी रामकृष्ण कर्डिले व सा.बां.चे उपअभियंता संजीवकुमार कोकणे यांना घेराव घालून इमारत उद्घाटनाचा ठराव नसताना उद्घाटन करण्याचा घाट का घातला जात आहे? याबाबत जाब विचारला. याबाबत लेखी देण्याच्या तयारीत असलेले गटविकास अधिकारी हतबल झाले. यानंतर आ.गडाख समर्थकांनी घोषणाबाजी करीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. यातील काही विरोधकांनी काढता पाय घेतला. एकमेकांना,‘ तुम्ही काय केले?’ असा जाब विचारत असतानाच वातावरण आणखीनच तापले. काहींनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले. (प्रतिनिधी)गटविकास अधिकाऱ्यांना घेरावयाबाबत पं.स. सदस्य जानकीराम डौले, बाळासाहेब मुरकुटे, अनिल ताके यांनी संयुक्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पंचायत समितीच्या बैठकीत कोणताही ठराव न घेता प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करणे अयोग्य आहे म्हणून याचा जाब विचारण्यासाठी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. सत्ताधारी राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.यावेळी सभापती कारभारी जावळे यांच्याशी चर्चा केली असता उद्घाटनाचा ठराव मासिक सभेत घेतला आहे. पंचायत समितीत जागेची कमतरता असल्यामुळे आचारसंहितेपूर्वी या इमारतीचे उद्घाटन करून काही कार्यालये नूतन इमारतीत हलविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.घाडगे, मोटे यांचा काढता पाय४पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी येथे आलेले साहेबराव घाडगे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाला विरोध करता, जनतेच्या प्रश्नाबाबत का समोर येत नाही? असा जाब विचारला. नियोजित साखर कारखान्यासाठी गोळा केलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा, अशी जमावाने मागणी करताच त्यांनी गाडीत बसून काढता पाय घेतला. हा आरडाओरडा बघताच मनसेचे दिलीप मोटे यांनीही पंचायत समितीच्या आवारातून निघून जाणे पसंत केले.