शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कवडे यांची बदली रद्द

By admin | Updated: May 1, 2016 01:40 IST

अहमदनगर : जलयुक्त शिवारसारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणारे जिल्हाधिकारी अनिल कवडे हेच नगरचे जिल्हाधिकारी राहणार आहेत.

अहमदनगर : जलयुक्त शिवारसारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणारे जिल्हाधिकारी अनिल कवडे हेच नगरचे जिल्हाधिकारी राहणार आहेत. त्यांची बदली रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी निघणार आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात दिली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कर्जत शहरालगत कान्हुळा नदीवरील विठ्ठल कुंड येथे केटीवेअर नाला बांधमधील गाळ काढणे, खोलीकरण व सरळीकरण अंतर्गत केलेल्या कामात साठलेल्या पाण्याचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी वरील घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्जतचे नगराध्यध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत. सध्या दुष्काळ आहे. चांगले काम करणाऱ्या जिल्हाधिकारी कवडे यांची बदली करणे योग्य होणार नाही. याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालून कवडे यांची बदली रद्द करावी.जाहीर कार्यक्रमात राऊत यांच्या मागणीबाबत पालकमंत्री शिंदे म्हणाले, कवडे यांनी जिल्ह्यात चांगले काम केले आहे. त्यांची झालेली बदली रद्द करण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्याशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. कवडे यांची बदली रद्द करण्यात येईल. याबाबत सोमवारी आदेश काढण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळे कार्यक्रमात टाळ््यांचा कडकडाट झाला. कुकडीच्या पाण्याबाबत शिंदे म्हणाले, निवडणुकीपूर्वी जनतेला पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हक्काचे पाणी मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हक्काचे पाणी पोलीस संरक्षण घेवून मिळविले आहे.