श्रीरामपूर : आचार्य आनंदऋषीजी हे फक्त जैन समाजाचे गुरू नसून सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान आहेत. त्यांनी दिलेल्या उपदेशाचे आचारण करुन जीवन सुखी व आनंदी बनवावे, असा उपदेश पू. श्री. रश्मीजी साध्वीजी यांनी दिला.आचार्य आनंदऋषीजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त जैन स्थानक मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यानिमित्त नवकार महामंत्राचा जाप, उपवास, आयंबील, तेले, एकासन आदींची तपसाधना झाली. रश्मीजी प्रवचनातून म्हणाल्या की, जैन समाजातील अनेक संप्रदायाच्या साधूसंतांना एका झेड्याखाली एकत्र आणण्याचे काम आनंदऋषीजींनी केले. त्यांनी धर्म प्रचाराचे कार्य करताना बालकांवर सुसंस्कार, धर्म शिक्षण, शालेय शिक्षण व मानव सेवेला महत्व दिले. यावेळी पू. श्री. मधुजी, पू. श्री. ममताजी म.सा., स्वरुपचंद कोठारी, पुष्पालाल कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. कांताबाई दुग्गड जैन महिला मंडळ, बहुमंडळ, अनिल चोरडिया, प्रतिभा कोठारी यांनीही स्तवन गायले. श्रीरामपूर संघाचे अध्यक्ष रमेश लोढा परिवारातर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली. (वार्ताहर)
‘आनंदऋषीजी महाराज सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान’
By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST