शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारीही जिल्ह्यात ३२७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची चिंता वाढली आहे. शनिवारी ३२७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या ...

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची चिंता वाढली आहे. शनिवारी ३२७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४४१ इतकी झाली आहे. एकाच दिवसात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५० आणि ॲण्टीजेन चाचणीत १८ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (९५), अकोले (५), जामखेड (३), कर्जत (१९), कोपरगाव (१६), नगर ग्रामीण (९), नेवासा (६), पारनेर (२८), पाथर्डी (३), राहाता (५२), संगमनेर (३६), शेवगाव (२२), श्रीगोंदा (८), राहुरी (७), इतर जिल्हा (५), श्रीरामपूर (१३) अशा रुग्णांचा समावेश आहे.

शनिवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ८४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६५ टक्के इतके झाले आहे. शुक्रवारी एकूण मृतांची संख्या ११५२ इतकी होती. त्यामध्ये शनिवारी दोनची भर पडली असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

-------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ७४,८४२

उपचार सुरू असलेले रुग्ण : १४४१

मृत्यू :११५४

एकूण रुग्णसंख्या : ७७,४३७