कामगारांच्या बोनसवर अपशब्द बोलणाऱ्या शेतकरी नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख या दोन नेत्यांची नावे न घेता निषेध करण्यात आला.
कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू असताना आर्थिक बाजू चव्हाट्यावर आणली तर ऊस तोडणी कामगार व गळीत हंगाम पूर्वतयारी यावर परिणाम होईल. त्यातून कारखाना बंद पडण्याची शक्यता आहे. कारखान्याचा सध्या राजकीय आखाडा होऊ नये याची दखल कारखान्याविरुद्ध आरोप करणारांनी व सत्ताधारी यांनी घ्यावी आणि कामगारांची रोजीरोटी वाचवावी अशी अपेक्षा साखर कामगार संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी आनंद वायकर यांनी केली.
वेळ पडल्यास कारखाना सुरू करण्यासाठी कामगार डोईवर कर्ज घेतील. पण कारखाना बंद पडू देणार नाही. अगस्तीसाठी कामगारांचा त्याग दृष्टीआड करू नका. चार महिन्यांचे पगार थकले तरी तालुक्याची कामधेनू वाचण्यासाठी कामगार झगडतो आहे. २० टक्के बोनसवर कोणी बोलू नये. कामगारांचा तो हक्क आहे. कारखान्याचे ५० टक्के कामगार ऊस उत्पादक सभासद मालक आहे तरीही कारखान्याच्या खांडीच्या आत कामगार राजकारण येऊ देत नाहीत. कारखाना बंद पाडण्यासाठी कुणी प्रयत्न करू नये अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा साखर कामगार युनियनचे अध्यक्ष शरद नेहे यांनी दिला.
निवडणुकीत जे कोणी सत्तेत येतील त्यांना सहकार्य करू, अशी कामगारांची बाजू धोंडीबा राक्षे, अशोक पापळ, विलास वैद्य, रावसाहेब वाकचौरे, मनोहर घुले, अनिल साबळे, विश्वास ढगे, बाळासाहेब भोर, संपत फोडसे आदींनी मांडली. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..................
राजीनामे मागे घ्यावेत
संचालक मंडळ डोक्यावर कर्ज काढून कारखाना चालवण्यासाठी तयार आहेत, पण त्यांच्यावर आरोप होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासक आला की कारखान्याचे वाटोळे झालेच समजा. म्हणून निवडणुकीच्या वेळी जरूर आरोप-प्रत्यारोप व्हावेत, सध्या कारखाना गळीत हंगाम तयारी सुरू असताना आरोपांची टिमकी बंद व्हावी व संचालक मंडळाने राजीनामे मागे घ्यावे, अशी अपेक्षा साखर कामगार महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी कोठवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
फोटो १७अगस्ती