शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

पुन्हा मतविभागणीच निर्णायक!

By admin | Updated: June 10, 2014 00:14 IST

भाऊसाहेब येवले,राहुरी राहुरी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ राहुरी, पाथर्डी व नगर अशा तीन तालुक्यांचा मिळून झालेल्या

भाऊसाहेब येवले,  राहुरीराहुरी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ राहुरी, पाथर्डी व नगर अशा तीन तालुक्यांचा मिळून झालेल्या या मतदारसंघात एकमेकांच्या व्होट बँकेबरोबरच मतविभागणी हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. कधीकाळी काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या राहुरी मतदारसंघावर गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपने वरचष्मा निर्माण केला आहे़ चंद्रशेखर कदम यांनी दोनदा, तर आमदार शिवाजी कर्डिले यांनी येथून एकदा विजयश्री खेचून आणला आहे़ आघाडीच्या जागावाटपात राहुरीची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे़ गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी केलेले शिवाजी गाडे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही़ गाडे यांचा सध्या काँग्रेसच्या गोटात वावर आहे. याशिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनीही अजून पत्ते उघडलेले नाहीत. आजघडीला भाजपतर्फे शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीकडून उषाताई तनपुरे अशी सरळ लढत निश्चित मानली जात आहे़ मागील वेळी कर्डिले यांच्या विजयाला कारणीभूत ठरलेले शिवाजी गाडे यावेळी कोणती भूमिका घेतात, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. सुभाष पाटील यांनी निर्णय घेतला नसला तरी माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या हालचालींवर त्यांची भूमिका अवलंबून राहील़ उषाताई तनपुरे यांचे नाव जाहीर करावे यासाठी कार्यकर्त्यांमधून दबाव वाढत आहे़ प्राजक्त तनपुरे व प्रसाद तनपुरे यांची नावे मागे पडल्याने उषाताई तनपुरे यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे़आमदार कर्डिले यांना गेल्या निवडणुकीत नगर व पाथर्डी तालुक्यांनीे उचलून धरले. राहुरी तालुक्यातून त्यांना फक्त अकरा हजार मतदानावर समाधान मानावे लागले होते़ गेल्या पाच वर्षात कर्डिले यांनी राहुरी तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले़ शिवाय मोदी लाटेचा फायदा त्यांच्यासाठी गृहित धरला जात आहे. राहुरीतून सरळ लढत झाली तर मात्र उषाताई तनपुरे त्यांना जोरदार टक्कर देतील. मात्र उमेदवारांची संख्या वाढली तर ते आमदार कर्डिले यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे कर्डिलेंच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, असा प्रयत्न सुरू झाला आहे़लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांना ४१ हजारांचे मताधिक्य