शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात महसूलपाठोपाठ पोलिसांचेही छापा सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST

श्रीगोंदा : तालुक्यात विविध नदीपात्रांतील वाळू उपशावर छापा टाकण्याचे महसूल विभागाचे सत्र सुरूच आहे. त्यातच रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनानेही ...

श्रीगोंदा : तालुक्यात विविध नदीपात्रांतील वाळू उपशावर छापा टाकण्याचे महसूल विभागाचे सत्र सुरूच आहे. त्यातच रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनानेही पेडगाव शिवारातील भीमा नदीपात्रात छापा टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्या १८ लाख रुपयांच्या दोन यांत्रिक फायबर बोटी व २ सेक्शन बोटी जप्त करून त्या उद‌्ध्वस्त केल्या. यासाठी जिलेटीनचा वापर करण्यात आला. या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

किशोर किसन ओव्हाळ (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या मालकीची एक फायबर व एक सेक्शन बोट व नविद मैनुद्दिन शेख (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) याच्या मालकीची एक फायबर व एक सेक्शन बोटी पोलिसांनी नष्ट केली. पोलीस आल्याचे कळताच बोटीमधून वाळू उपसा करणारे पसार झाले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध वाळू उपशाबाबत ग्रामस्थांकडून तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे सुचित केले. त्यामुळे स्थानिक महसूल व पोलीस पथकांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, प्रकाश मांडगे, संजय काळे, गोकुळ इंगवले, दादासाहेब टाके, किरण बोराडे यांनी केली. म्हसे शिवारातील घोड नदीपात्रात दोन दिवसांपूर्वी महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत चार बोटी उद‌्ध्वस्त करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार यांनी स्वत: या कारवाईत लक्ष घातले होते. त्यानंतर आता पोलीस प्रशासनानेही कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईचे नदीपट्ट्यातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.