जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४ आणि अँटिजन चाचणीत ४१४ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १, अकोले १, जामखेड ४, नगर ग्रामीण २, राहुरी २, संगमनेर २ आणि श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये मनपा ९, अकोले ४, जामखेड २, कर्जत २, कोपरगाव १७, नगर ग्रामीण ८, नेवासा १४, पारनेर १८, पाथर्डी १२, राहाता २७, राहुरी १६, संगमनेर १३, शेवगाव २०, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत शुक्रवारी ६२१ जण बाधित आढळले. त्यात मनपा ७१, अकोले १३, जामखेड १४, कर्जत १२, कोपरगाव १८, नगर ग्रा. ४५, नेवासा १५, पारनेर ७३, पाथर्डी ४३, राहाता १७, राहुरी १५, संगमनेर १३, शेवगाव ११, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
--------------
बरे झालेली रुग्ण संख्या : २,६६,२८४
उपचार सुरू असलेले रूग्ण : ३,३६५
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५,५३०
एकूण रूग्ण संख्या : २,७५,१७९