राहुरीतील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सुभाष मोरे शासनाच्या मोफत कोरोना चाचणी प्रयोगशाळेत कार्यरत होते. रोज ५० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी मंगळवारपासून नगर येथे जिल्हा रुग्णालयात हजर होण्याचा आदेश बजावला. राहुरीतील प्रयोगशाळा सहायक सौरभ वाल्मीक यांना पूर्वीच नगर येथे, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वर इघे यांना साकूर येथे वर्ग केले आहे. एकमेव राहिलेले मोरे यांनाही नगरला बोलाविल्याने राहुरीतील कोरोना चाचण्या बंद पडणार आहेत. राहुरीतील कोरोना चाचण्या बंद पडू नयेत, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याशी बोलणार आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मोरे यांची नगरला बदली झाल्याचे माहिती नव्हते, असे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी सांगितले.
राहुरीत २५ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST