शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींची होणार नार्को चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 01:04 IST

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्याकांड प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, तपासी पथकाने या घटनेतील आरोपींच्या आता मानसशास्त्रीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्याकांड प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, तपासी पथकाने या घटनेतील आरोपींच्या आता मानसशास्त्रीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे़ शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाकडे आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी विनंती अर्ज करण्यात आला आहे़ आरोपींची संमती व न्यायालयाच्या निर्णयानंतर या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व कोपर्डी प्रकरणातील तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ कोपर्डी प्रकरणातील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ या तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे़ पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला़ तसेच घटनेची सविस्तर माहिती घेत या प्रकरणी पुरावे एकत्र केले आहेत़ आरोपींना घटनास्थळी पाहणाऱ्यांचीही साक्ष नोंदविण्यात आली आहे़ या आरोपींविरोधात सक्षम दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी या मानसशास्त्री चाचण्या करण्यात येणार आहेत़(प्रतिनिधी)आरोपींना न्यायालयीन कोठडीकोेपर्डी प्रकरणातील दोन आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली़ आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ कोपर्डी घटनेतील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे तीनही आरोपी आता न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत़ त्यांची रवानगी कर्जत कारागृहात करण्यात आली आहे़ या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्यावर जिल्हा न्यायालय परिसरात दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी शनिवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता़ मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी आरोपींची परवानगी आवश्यक असते़ आरोपींची संमती मिळाली तरच या चाचण्या केल्या जातात़ न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कोपर्डी प्रकरणातील आरोपींची ‘नार्को’, ‘ब्रेन मॅपिंग’, ‘लायडिटेक्टर’, ‘पोलिग्राफ’ या चाचण्या घेण्यात येणार आहेत़