शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

हिंद सेवा मंडळासाठी ९० टक्के मतदान

By admin | Updated: March 27, 2016 23:37 IST

अहमदनगर : हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी सरासरी ९० टक्के मतदान झाले.

अहमदनगर : हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी सरासरी ९० टक्के मतदान झाले. आजीव सभासदांच्या मतदानाची टक्केवारी ८१ टक्के, तर सभासद प्रतिनिधींच्या मतदानाची टक्केवारी ९९ टक्के होती. नगर, श्रीरामपूर, मिरजगाव आणि अकोले अशा चार ठिकाणी शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी एकपर्यंत निकाल हाती येतील.हिंद सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. हिंद सेवा आणि प्रगती पॅनल आमने-सामने होते. प्रा. मधुसूदन मुळे, अविनाश आपटे, शिरिष मोडक आणि सुनील रामदासी यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलमध्ये लढत होती. एकूण २३ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वच केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अ‍ॅड. सुधीर झरकर आणि हेमंत जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. रविवारी सायंकाळी चार वाजता मतदान संपले. माजी आमदार मधुकर पिचड यांनी या निवडणुकीत प्रथमच मतदान केले. खासदार दिलीप गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप यांनीही मतदान केंद्रावर हजेरी लावून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रांवर तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)