अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपाची स्पर्धा सुरू आहे. गेल्या चार महिन्यात ९५ लाख ६८ हजार हजार मेट्रिक टनाचे उसाचे गाळप करण्यात आले असून, ८९ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. सरासरी ९ टके साखर उतारा निघाला आहे.
यंदा पुरेसा पाऊस झाल्याने ऊसाचे पीक चांगले आले. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला. नोव्हेंबर २०२० मध्ये कारखान्यांनी गाळप सुरू केले. चालू वर्षी जिल्ह्यातील २१ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस तोडणीसाठी पूर्वी झोन बंदी होती. ही बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्यांनी इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून ऊस आणला. शेतकऱ्यांना यामुळे पर्याय खुला झाला. शेतकऱ्यांना ज्या कारखान्यांनी भाव दिला, त्या कारखान्याला ऊस दिला. त्यामुळे कारखान्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी ९५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून ८९ लाख क्विंटल साखर तयार झाली असून, उतारा मात्र यंदा कमी निघाला. सरासरी ९ ते १० टक्के उतारा निघाला आहे. पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यंदा उसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना दुहेरी तोटा झाला आहे.
....
ऊस गाळप क्विंटलमध्ये
संजीवनी- ४,१५,५८०
कोपरगाव- ४,०२०००
श्रीगणेश- १,४०, ९२५
अशोक- ३,३२,३००
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील- ४,०५०००
श्रीगोंदा- ५,५४,१२५
स्व. भाऊसाहेब थोरात- ७,६०, ९७०
ज्ञानेश्वर- ८,१९, ५५०
वृद्धेश्वर - २,७५, १५०
मुळा- ६,८३,९००
अगस्ती- ३,८२,६५०
केदारेश्वर- २,००,०००
कुकडी- ४,८७, ६००
श्री क्रांती शुगर- १,३४,७२५
पीयूष शुगर- १,०२,६५०
अंबालिका- ११,३०,१५०
गंगामाई- ६,४०, ३५०
साईकृपा-२,२०,७००
प्रसाद शुगर- ४,१६,०००
जयश्रीराम शुगर- १,६१, ४९०
युटेक- २,४९, ३००