शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील नगरपालिकांकडून ८० टक्के कच-याचे विघटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:16 IST

नगरविकास विभागाने महापालिकेसह नगरपालिकांना कचरा वर्गीकरणासाठी एप्रिल २०१८ पर्यंत मुदत दिल्याने अहमदनगर महानगरपालिकेसह नगरपालिकांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरी भागातील किमान ८० टक्के कच-याचे वर्गीकरण न केल्यास शासनाकडून मिळणारे अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर : नगरविकास विभागाने महापालिकेसह नगरपालिकांना कचरा वर्गीकरणासाठी एप्रिल २०१८ पर्यंत मुदत दिल्याने अहमदनगर महानगरपालिकेसह नगरपालिकांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरी भागातील किमान ८० टक्के कच-याचे वर्गीकरण न केल्यास शासनाकडून मिळणारे अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, देवळाली प्रवरा, आणि पाथर्डी नगरपालिकांनी ओला- सुका कच-याचे उद्दिष्ट मुदतीपूर्वीच साध्य केले आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील नऊ नगरपालिका सहभागी झाल्या आहेत. अभियानात सहभागी झालेल्या पालिकांनी स्वच्छतेसह कचरा वर्गीकरणाला प्राधान्य दिलेले आहे. ओला सुका व घरगुती कच-याचे निर्मितीच्या जागीच वर्गीकरण करून त्याची स्वतंत्र वाहतूक करणे अपेक्षित आहे. त्यानुसार महापालिकेसह जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांकडून दररोज कच-याचे वर्गीकरण करण्यात येत आहे.केंद्र शासनाने दिलेली मुदत येत्या एप्रिलमध्ये संपणार आहे. शहरात निर्माण होणा-या कच-याच्या किमान ८० टक्के कच-याचे वर्गीकरण न केल्यास अनुदान बंद करण्याचा इशारा नगरविकास खात्याने दिलेला आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी अडीच महिने पालिकांच्या हातात आहे. दोन महिन्यांत कचरा वर्गीकरण करून ८० टक्क्यांचा टप्पा पार करण्याचे आव्हान पालिकांसमोर आहे. जिल्ह्यातील तीन नगरपालिकांनी मुदर्तीपूर्वी उद्दिष्ट साध्य केले आहे. महापालिकेचे काम मात्र मंदावले असून, शहरातील ६० टक्के कच-याचे वर्गीकरण केले जात आहे. पुढील दोन महिन्यांत महापालिकेला २० टक्केंचा टप्पा पार करावा लागेल, अन्यथा केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदानाला मुकावे लागणार आहे.

कचरा प्रक्रियेत जिल्हा आघाडीवर

अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, राहुरी, कोपरगाव, देवळालीप्रवरा, राहाता, पाथर्डी आणि श्रीगोंदा नगरपालिकांनी कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू केलेले आहेत. शहरासह जिल्ह्यात निर्माण होणा-या कच-यावर प्रक्रिया करण्यात येत असून, सर्व पालिकांचे प्रकल्प कार्यान्वित आहेत.

शिर्डी शंभर टक्के

शिर्डी शहरात निर्माण होणा-या शंभर टक्के कच-याचे ओला व सुका, असे वर्गीकरण करण्यात येते. मुदतीपूर्वी १०० टक्के कच-याचे वर्गीकरण करणारी जिल्ह्यातील शिर्डी नगरपालिका एकमेव आहे. सर्वाधिक ओला कचरा या परिसरात निर्माण होत असून, त्यावर प्रक्रिया करण्यात येते.

ओला सुका वर्गीकरण

जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर आणि देवळाली प्रवरा नगरपालिकांकडून ८० तर महापालिका-६०, राहुरी-७०, राहाता-६०, पाथर्डी-७०, श्रीगोंदा-५० टक्के कच-याचे वर्गीकरण करण्यात येते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान