शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

७८ लाखांचा गैरव्यवहार

By admin | Updated: July 31, 2016 23:50 IST

अहमदनगर : खातगाव टाकळी (ता.नगर) येथील ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे राबविताना झालेल्या गैरव्यवहारातील दोषी असणाऱ्यांवर सहा महिन्यात कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला.

अहमदनगर : खातगाव टाकळी (ता.नगर) येथील ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे राबविताना झालेल्या गैरव्यवहारातील दोषी असणाऱ्यांवर सहा महिन्यात कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. यात सकृत दर्शनी ७८ लाखांचा अपहार झाल्याचा संशय असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहा जण दोषी आढळण्याची शक्यता आहे.याबाबतची माहिती अशी, नगर तालुक्यातील मौजे खातगाव टाकळी ग्रामपंचायतीमध्ये २००१ ते २०१४ या कालावधीमध्ये विविध योजनेतून विकास कामे करण्यात आली. यासाठी राज्य शासन व लोकवर्गणीच्या माध्यमातून मोठा निधी जमा झाला. यात बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी योजनेतून जलवाहिनी, घरोघरी नळ जोडणी, पाणी पुरवठा अनामत ठेव, पाणीपट्टी, लोकवर्गणी, इंदिरा आवास व राजीव गांधी निवारा योजना, दलित वस्ती सुधार योजना, ग्रामपंचायतीकडे जमा गौण खनिजाचे स्वामित्त्व रकमेत मोठ्या प्रमाणावर या कामाशी संबंधित ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मोठ्या रकमेचा गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केला.सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटीलबा कुलट यांनी माहिती अधिकारातून या कामांची माहिती घेतली. या माहितीवरून विकास कामांमध्ये अनेक गैरव्यवहार असल्याचे निदर्शनास आले. या गैरप्रकाराची चौकशी होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदने दिले. उपोषणही केले, मात्र याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. नंतर कुलट यांनी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. अ‍ॅड.अनिरुद्ध निंबाळकर व अ‍ॅड.हरिहर गर्जे यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली. या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने ग्राम विकास विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढल्या. नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची याचिकेतील मुद्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली. यात पाणी पुरवठा योजना, पाणीपट्टी, अनाधिकृत नळ जोडणी, व्यायाम शाळा, लोकवर्गणी यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.न्यायाधीश आर.एम. बोर्डे व न्या.के.एम. वडणे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार दोषींवर सहा महिन्यात कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला, अशी माहिती कुलट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात ७८ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, यात काही वरिष्ठ अधिकारीही असण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत मिठू कुलट, सुनील कुलट, शाम कुलट, दादा कुलट, एकनाथ वेताळ, गोकुळ साळवे, दत्तु कुलट उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)