देशासह राज्यात असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केवळ बारावीच्या परीक्षांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने बारावीची परीक्षा होणार की रद्द करणार, याबाबत शिक्षक, पालकांसह विद्यार्थीही संभ्रमात होते.
अखेर दोन दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर गुरुवारी राज्य मंडळाने बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
नगर जिल्ह्यात बारावीसाठी साडेचारशे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून ६४ हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आता अंतर्गत मूल्यमापनानुसार हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. दहावीप्रमाणे बारावीसाठीही पुढील वर्गात प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याबाबत शासन विचाराधीन आहे.
--------------
बारावीसाठी प्रविष्ट विद्यार्थी - ६४१२४
एकूण शाळा - ४५०
--------------