अहमदनगर : महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून निवड झालेल्या वर्ग एक व दोनच्या ५१ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना येथील एमआयआरसीमध्ये आठवडाभर विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. अधिकारी म्हणून भावी काळात राज्यात विविध ठिकाणी काम करताना सुरक्षा, तसेच शारीरिक सुदृढता असावी या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण देण्यात आले. देशातील प्रमुख प्रशिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या येथील मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या (एमआयआरसी) अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. देशप्रेम, स्वयंशिस्त, जबाबदारी आदी गुणांची रूजवणूक अधिकाऱ्यांत होणे हा प्रशिक्षणाचा हेतू आहे. आपतकालीन परिस्थितीत सैन्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांत समन्वय राहावा, या दृष्टीनेही हे प्रशिक्षण महत्वाचे होते. अधिकारी यांच्याकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शस्त्र चालवणे, वाहन चालवणे, तसेच शारीरिक तंदुरूस्तीच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. लष्करी कामकाज, आपतकालीन परिस्थितीत लष्काराशी राखायचा समन्वय या विषयी अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ३९ पुरूष व १२ महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
राज्यातील ५१ अधिकाऱ्यांना लष्करी प्रशिक्षण
By admin | Updated: September 20, 2014 23:23 IST