संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले, राज्यासह शहर व तालुक्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. लसीकरण जेवढे जास्त होईल, तेवढे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बळ मिळेल, एकतर रिक्षाचालक हा रस्त्यावर वेगवेगळे प्रवासी घेऊन प्रवास करीत असतो, कोण कोठून आले याची त्याला कल्पना नसते. तेव्हा रिक्षाचालकांच्या दृष्टीने कोरोना लसीकरण करणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. रिक्षा संघटनेच्या कार्यालयात सभासद, रिक्षाचालक-मालक यांच्या नावनोंदणीस सुरुवात करण्यात आली. याकामी संघटनेचे संस्थापक, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या सूचनेप्रमाणे शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांनी विशेष मदत केली. रिक्षाचालकांच्या लसीकरणकामी पापा तांबोळी, प्रकाश शेळके, अनिल वाघ, रवींद्र वाघ, संजू पवार, रणजित पंडोरे या रिक्षा सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कोपरगावात दररोज ५० रिक्षाचालकांचे होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST