शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

४०० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 00:44 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने दागिन्यांच्या विक्रीवर अबकारी कर लावल्याने गेल्या चाळीस दिवसांपासून सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला बंद सुरूच असून,

करडीतील प्रकार : दोन डॉक्टरांसह पाच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त , रुग्णांची हेळसांडकरडी (पालोरा) : करडी प्राथमिक आरोग्य केंद्र मनुष्यबळाअभावी आॅक्सिजनवर आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर पाच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मुंढरी येथील आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पुंडलिक डोंगरवार यांच्या खांद्यावर प्रभार टाकून प्रशासन मोकळे झाले आहे. दोन ठिकाणी कामकाज सांभाळतांना डॉक्टरांची दमछाक होत असून रुग्णांना उपचारांसाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली असताना तेसुध्दा हतबलता दाखवीत असल्याने इलाज करायचा तरी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोहाडी तालुक्यातील करडी प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या मनुष्यबळाअभावी अडचणीत सापडला आहे. परिसरातील २५ गावांतील ४५ हजार लोकसंख्येचे आरोग्य या केंद्रावर अवलंबून आहे. शहरांपासूनचे अंतर ३५ ते ४० किमीचे असून मोहाडी तालुक्याला जाण्यासाठी तुमसर शहरातून जावे लागते. २५ गावात एकही एमबीबीएस डॉक्टर नाही.त्यामुळे आरोग्यासंबंधी सुविधांसाठी येथील आरोग्य केंद्रावर नागरिक अवलंबून आहेत. कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या भागात आदिवासींची संख्यासुद्धा मोठी आहे. वैनगंगा नदीमुळे येथील लोकांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंढरी ते रोहा दरम्यान वैनगंगा नदीवर पूल नुकताच प्रस्तावित करण्यात आला. मात्र निधी अजुनही मंजूर झालेला नाही. निव्वळ पुल नको, बंधारा अधिक पूल अश्या बांधकामाची मागणी येथील नागरिकांची आहे. सिंचनाची सोय होणे सुद्धा गरजेचे आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्राची सरासरी रोजची ओपीडी १५० ते २०० च्या वर आहे. पावसाळ्यात २५० ते ३०० च्या घरात असते. गरोदर माता तपासणी व उपचारासोबत बाळंतपण होण्याच्या बाबतीत कोंढा आरोग्य केंद्रानंतर येथील केंद्राचा जिल्ह्यात क्रमांक दोन आहे. सन २०१५-१६ या वर्षात १९६ बाळंतपण येथे झाले आहेत. कुटुंब कल्याणाचे उद्दिष्ट्यापेक्षा १०५ टक्के म्हणजे १५८ च्या उद्दिष्टापैकी १६५ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. लसीकरण, टी.बी., कुष्ठरोग, जलजन्य व कीटकजन्य आजारांचे प्रमाणही अधिक आहेत. सिकलसेल, एचआयव्ही तपासणी व इतर आरोग्य सुविधा यासाठीसुद्धा हे एकमेव केंद्र आहे.एकंदर आरोग्य सोयी सुविधांसाठी करडी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने सध्या केंद्रच आॅक्सिजन चालत आहे. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. डॉ. गभने दि.१९ मार्चपासून रजेवर आहेत. वर्षभरापासून डॉ. डोंगरवार यांचेकडे प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. आरोग्य सहायकाचे पद १० महिन्यापासून तर कंत्राटी अधिपरिचारिका वर्षा वनवे यांनी राजीनामा दिल्याने दीड महिन्यापासून पद रिक्त आहेत.नीलज उपकेंद्रात आरोग्य सेविकेचे तर नीलज बुज व करडी उपकेंद्रात आरोग्य सेवकाचे प्रतयेकी एक पद रिक्त आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अनेकदा माहिती देऊनही डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याची हतबलता दाखवीत असल्याने, रुग्णांवर उपचार करायचा तरी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांसाठी येथील रुग्णांना तासनतास वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने असंतोषाची भावना व्याप्त आहे. ग्रामीण रुग्णालयाची मागणी होत आहे. (वार्ताहर)