शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जिल्ह्यात ३४ वादळग्रस्त शाळा

By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST

अहमदनगर : जिल्ह्यात २ जून ते ८ जून दरम्यान झालेल्या वादळात सात तालुक्यातील ३४ प्राथमिक शाळांचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात २ जून ते ८ जून दरम्यान झालेल्या वादळात सात तालुक्यातील ३४ प्राथमिक शाळांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक शाळा एकट्या शेवगाव तालुक्यातील १३ असून समसूद ऐरंडगाव या गाव आणि परिसारातील सहा शाळांचा समावेश आहे. सोमवार (आज) पर्यंत या वादळग्रस्त शाळांची माहिती जिल्हा परिषदेत संकलित करण्यात येणार आहे.जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाखा दिला. यात सुमारे ७०० हून अधिक घरांचे नुकसान होत शेकडो कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत. वादळात सहा जणांचे बळी गेले असून जनावरे, वीजेचे खांब यांचे नुकसान झालेले आहे. यासर्व ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्तीच्या निधीतून भरपाई देण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी देखील जिल्हा प्रशासनाकडून मदत घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी सांगितले. यासाठी वादळग्रस्त शाळांचे फोटो, पंचनाम्यांची माहिती आज संकलित होणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी सांगितले.जिल्ह्यात अजून तीन-चार तालुक्यातील माहिती संकलीत होणे बाकी असून तेथील माहिती मिळाल्यावर वादळग्रस्त शाळांचा आकडा वाढणार आहे. दरम्यान, येत्या १६ जूनला शाळा सुरू होणार आहे. संबंधीत ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीने संबंधीत गावच्या ग्रामपंचायती मार्फत पर्यायी ठिकाणी शाळा भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वांबोरीत जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात आल्या होत्या. त्या शाळा खोल्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.वादळग्रस्त शाळांची तालुकानिहाय नावेशेवगाव : समसूद ऐरंडगाव- सहा, आधोडी, राक्षी, लोहगाव, नजनवस्ती, जमधाडेवाडी, आखातेवाडी, आव्हाणे.नेवासा : देवगाव, हरहर.राहुरी : वांबोरी.पाथर्डी : तुळजावाडी, वडगाव.राहाता : अस्तगाव.संगमनेर : वैदूवाडी, येठेवाडी, सांगळेवाडी.अकोले : सरोदे वस्ती.