शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST

खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या ...

खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन सुरू असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ दगडी तोफगोळे सापडले.

१७९५ साली येथे झालेल्या मराठा आणि निजाम यांच्या लढाईत येथील तोफगोळ्यांचा उपयोग झाला असण्याची शक्यता इतिहासतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषत: इसवी सन १७९५ निजाम आणि मराठे यांच्या युद्धामध्ये तत्कालीन तोफखान्याचा प्रमुख यांनी या तोफगोळ्यांचा वापर केला होता. या लढाईचे ऐतिहासिक पुरावे आजही किल्ला परिसरात सापडतात.

सध्या किल्ल्याच्या आतील परिसरात उत्खनन सुरू आहे. पडझड झालेली तटबंदी, किल्ल्याच्या बाहेरील भागातील खंदकाचे नव्याने बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर येथे उत्खनन करून किल्ल्याच्या पुरातन रचनेचा अभ्यास करून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा पुरातत्त्व विभागाचा मानस आहे. या उत्खननात इथे तत्कालीन दगडी तोफांचे अवशेष, धान्याची कोठारे, दारूगोळ्याची कोठारे, काही चोरवाटा, भुयारी वाटा नव्याने सापडल्या आहेत. तरी या उत्खननामधून या चोरवाटा मोकळ्या व्हाव्यात तसेच किल्ल्याला मूळ स्वरूप प्राप्त होऊन तेथील पुरातन रचना नागरिकांपर्यंत याव्यात, यासाठी हे उत्खनन महत्त्वाचे ठरत आहे. अहमदनगर वस्तुसंग्रहालयात खर्डा येथील मराठा-निजाम लढाईत वापरलेली तोफ आजही संग्रहित आहे.

----

ऐतिहासिक खर्डा शहरात आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गावातील निंबाळकर गढीवर लवकरच ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अशा ऐतिहासिक तोफगोळ्यासारख्या ठेव्यांचे संवर्धन होईल. किल्ल्याचे सध्या सुरू असलेले काम गौणखनिजाच्या पुरवठ्याअभावी बंद आहे. याबाबत तहसीलदार यांच्याकडे सकारात्मक मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-विजयसिंह गोलेकर, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समिती

-----------

निजाम-मराठे लढाईत मराठ्यांनी या लढाईत तोफांचा वापर केला. या लढाईत निजामाच्या सैन्यावर दोन बाजूंनी तोफांचा मारा करण्यात आला होता. त्यामुळे निजाम सैन्याची फळी दोन भागांत विभागली गेली होती. याचा फायदा मराठा सैन्यास पुरेपूर झाला. लढ्यातील पराभवानंतर निजामाने खर्डा किल्ल्यात आश्रय घेतला होता. त्यानंतर मराठा सैन्याने खर्डा किल्ल्यावर तोफा डागल्या. त्यामुळे निजामाने संपूर्ण शरणागती पत्करली होती.

-प्रा. धनंजय जवळेकर, इतिहास संशोधक

..........

फोटो दोन ०५ खर्डा तोफगोळे

खर्डा येथील भुईकोट किल्ल्यात सापडलेले भुईकोट किल्ले. दुसऱ्या छायाचित्रात तोफगोळे सापडलेली जागा.