अहमदनगर : जिल्ह्यातील बाधितांची संख्या सातशेवरून थेट तीनशेपर्यंत कमी झाली. जिल्ह्यात शनिवारी ३०९ कोरोनाबाधित आढळले. नगर शहरातील केवळ ५ जणांचाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होऊन ती ३ हजार ४६ वर आली आहे.
उपचार सुरू असलेल्यांपैकी शनिवारी ५७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार ८६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.८७ टक्के इतके आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८० आणि अँटिजन चाचणीत ११५ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (५), राहाता (१४), संगमनेर (१८), श्रीरामपूर (२७), नेवासे (१८), नगर तालुका (८), पाथर्डी (२९), अकोले (१२), कोपरगाव (१३), कर्जत (१२), पारनेर (३७), राहुरी (२१), भिंगार (१), शेवगाव (३८), जामखेड (३०), श्रीगोंदा (२०), इतर जिल्हा (६) येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर ५० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५,५८० इतका झाला आहे.
---
बरे झालेली रुग्ण संख्या : २,६६,८६२
उपचार सुरू असलेले रुग्ण : ३,०४६
मृत्यू नोंद : ५,५८०
एकूण रुग्ण : २,७५,४८८