शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४ हजार कोविड केअर सेंटर तयार,उपचारासाठी त्रिस्तरीय आराखडा,विशेष कोविड हेल्थ सेंटरसाठी एक हजार बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमदनगर  : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच १४ तालुक्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधूनच (सीसीसी ) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमदनगर  : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच १४ तालुक्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधूनच (सीसीसी ) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.आजाराची लक्षणे दिसतील त्यांना विशेष कोविड हेल्थ सेंटर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येईल. सीसीसीसाठी जिल्ह्यात ४ हजार १०० बेडसची उपलब्धता तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी १ हजार २९ बेडसच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी ५४० बेडसची उपलब्धता असणार आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका आरोग्य विभागाशी समन्वय करुन यासंदर्भातील यंत्रणा सज्ज केली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात सीसीसी,  डीसीएचसी आणि डीसीएच सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेला पाठविल्या होत्या. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात तशी व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीसीसाठी विविध बांधून पूर्ण झालेल्या इमारती, वसतीगृहे यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या त्या भागातील सर्व तापाचे रुग्ण या केंद्रांवर संदर्भित केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये तापाच्या रुग्णांवर उपचार केले जातील. ताप कोविड सदृश्य आजारामुळे असल्याचे निदान झाल्यास अशा रुग्णास संशयित रुग्ण कक्षात दाखल केले जाईल. अशा रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. तपासणीअंती कोविड संसर्ग असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच रुग्णास आजाराची लक्षणे नसल्यास याच सीसीसी मधील विलगीकरण कक्षामध्ये त्याला दाखल केले जाईल. चाचणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढील औषधोपचार देऊन घरी पाठवण्यात येईल. मात्र, रुग्णास मध्यम तीव्रतेचा आजार असल्यास त्याला विशेष अर्थात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये संदर्भीत करण्यात येईल. याठिकाणी आॅक्सिजनची व्यवस्था असणार आहे. तीव्र असल्यास त्याला थेट डेडिकेटेड कोविड ह़ॉस्पिटलमध्ये संदर्भीत करण्यात येईल. रुग्णास कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये संदर्भीय करु नये, अशा मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.