शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मुळा पात्रात वाळू तस्करांचा २६ लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 16:29 IST

मुळा नदी पात्रात जिल्हा गुन्हे अन्वेषणच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आॅनलाईन लोकमतराहुरी (अहमदनगर), दि़ ४ - मुळा नदी पात्रात जिल्हा गुन्हे अन्वेषणच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुरी ते बारागाव नांदूर या शिवरस्त्यालगत डिग्रस नदी पात्रात अचानक टाकलेल्या छाप्यामुळे वाळू उचलेगिरी करणाऱ्यांची धावपळ उडाली.पोलीस निरीक्षक दिलीप पवार, विष्णू घोडेचोर, सुनील गायकवाड, प्रमोद जाधव, संदीप पवार, देविदास काळे यांच्या पथकाने मुळा नदी पात्रामध्ये अचानक छापा टाकला़ वाळू उचलेगिरी करणाऱ्यांनी नदी पात्रातून पळ काढण्यात यश मिळविले़ पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत दोन डंपर, एक ट्रॅक्टर, दोन दुचाक्या मिळून २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़राहुरी पोलीस ठाण्यात मनोहर गोसावी यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संजय पाटोळे (रा. विळद), मुज्जफर शेख (रा. बारागाव नांदूर), अप्पासाहेब शिरसाट (रा.राहुरी) व बाळासाहेब मगरे यांच्याविरुध्द वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास कल्लू चव्हाण करीत आहेत़मुळा नदीचे पात्र वाळूउपशामुळे दहा ते पंधरा फूट खाली गेले आहे़ त्यामुळे मुळा नदी काठावर असलेल्या विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. नदी पात्रातून पाणी वाहून गेले़ याशिवाय बंधारेही भरण्यात आले़ मात्र बऱ्या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे़ वाळूउपशामुळे नदी पात्राची रुंदी वाढत असल्याचे आढळून आले आहे़